शरीरातील स्नायूंना बळकट करण्यासाठी आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणं महत्वाचं ठरतं.
मात्र प्रोटीनचा विषय निघाला की अनेकदा डोळ्यासमोर दोनच गोष्टी येतात एक म्हणजे अंड आणि दुसरं म्हणजे पनीर.
मांसाहारी लोक अधिकतर प्रोटीनसाठी अंड खाण्यास प्राधान्य देतात तर शाकाहारी लोक पनीर खाण्यास प्राधान्य देतात.
दोन मोठ्या आकाराची अंडी ज्यांचे वजन सुमारे 100 ग्रॅम असेल त्यांमध्ये 13 ग्रॅम प्रोटीन असतं.
100 ग्रॅम पनीरमध्ये सुद्धा प्रोटीनच प्रमाण हे जवळपास 18 ग्रॅमच असतं.
100 ग्रॅम पनीरमध्ये फॅट्सचे प्रमाण 20 ग्रॅम असून त्यात सुमारे 1.2 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. पनीर कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत देखील आहे.
100 ग्रॅम उकडलेल्या अंड्यांमध्ये सुमारे 10 ग्रॅम फॅट्स आणि 1 ग्रॅमपेक्षा कमी कार्बोहायड्रेट असते. तसेच यात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, सेलेनियम आणि कोलीन सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)