पुरेशी झोप ही शरीरासाठी आवश्यक असते. झोप पूर्ण झाली तर दिवसभर उर्जा टिकून राहते.
शारिरीक व मानसिकरित्याही व्यक्ती फ्रेश राहतो. पण गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्याने नुकसानी होऊ शकते
रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे गरजेचे असते. शरीरासाठी झोप आवश्यकच असते.
जास्त झोपल्यामुळं तुमचं पुर्ण दिवसाचे शेड्युल बिघडते. उशीरा उठल्याने शरीर सक्रीय राहत नाही. त्यामुळं वजन वाढण्याचा धोका संभवतो
9 ते 10 तास झोप काढल्याने टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
जास्त झोप घेतल्याने हृदय विकाराचे आजारही बळावू शकतात.
जास्त प्रमाणात झोपल्याने कंबरदुखी किंवा डोकेदुखीदेखील होऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)