मासिक पाळीचे दिवस हे महिलांसाठी दर महिन्यातील सर्वात त्रासदायक दिवसांपैकी असतात.
या काळात हार्मोनल बदल झाल्याने थकवा, मूड स्विंग आणि पोटदुखीसारखे त्रास जाणवतात.
मासिक पाळीच्या पहिल्या दोन दिवशी फार जास्त वेदना होतात. या काळात मुली आरामाला प्राधान्य देतात आणि कमीत कमी कष्टायची कामं करतात.
काही महिला मासिक पाळीच्या दिवसांमध्येही व्यायाम करतात. तर काही मासिक पाळीसंदर्भातील समस्या आणि गैरसोयीचा विचार करुन या दिवसांमध्ये व्यायाम टाळतात.
मात्र मासिक पाळीच्या काळात सौम्य स्वरुपाचा व्यायाम करण्यात काही गैर नाही. किती ऊर्जा आहे आणि शारीरिक त्रास किती होतोय याचा विचार करुन व्यायाम करावा.
चालणे, योग अभ्यास, स्ट्रेचिंग, ध्यान करण्यासारखे व्यायाम प्रकार मासिक पाळीच्या काळात करता येतात. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मासिक पाळीच्या काळात थोडा आराम मिळतो.
व्यायाम केल्याने एंडोर्फिन हार्मोनचं शरीरात उत्सर्जन होतं. यामुळे मूड स्विंग्स आणि तणाव दूर करण्यास मदत होते आणि डोकं शांत राहतं.
मासिक पाळीचा जास्त त्रास होत असेल, शरीर दुखत असेल, चक्कर येणं, पोटदुखी असा त्रास असेल तर व्यायाम करु नये. अशावेळी आरामाला प्राधान्य द्यावं.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)