बऱ्याचदा नियमित ब्रश करून सुद्धा तोंडाची दुर्गंधी जात नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी इतरांशी बोलताना संकोच वाटतो, तेव्हा ही दुर्गंधी दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
तोंडाला सतत घाण वास येत असेल तर कडुलिंबाच्या पेस्टने दात घासावेत. याने दातांना कीड लागणार नाही तसेच दुर्गंधीची समस्या सुद्धा दूर होईल.
तोंडाचं आरोग्य हे जर उत्तम ठेवायचं असेल तर तुरटी सर्वाधिक उपयुक्त ठरते. तुरटीच्या पावडरमध्ये सेंद्रिय मीठ मिसळून पेस्ट तयार करून त्याने दात घासल्याने दात निरोगी राहतात.
दातांना कीड लागून तो दुखत असेल तर त्या ठिकाणी लवंग ठेवा, किंवा लवंगाच्या तेलाने दातांना हलक्या हाताने मालिश करा.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी रोज अर्धा चमचा मीठ घेऊन त्यात मोहरीचं तेल मिसळा आणि त्याने दात घासा. त्याने समस्या दूर होऊ शकेल.
कडूलिंबाची पानं वाटून त्याचू पेस्ट तयार करा आणि ती हिरड्यांवर लावा. असं केल्यावर 10-15 मिनिटांनी कोमट पाण्याने चूळ भरा यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होईल.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)