फाल्गुन अमावस्येला दान करा 'या' 3 वस्तू; भरभरून होईल धनलाभ

Feb 27,2025

फाल्गुन अमावस्या 2025

सनातन धर्मानुसार अमावस्येला विशेष महत्त्व असतं. या दिवशी भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते.


पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन अमावस्या 27 फेब्रुवारीला 8 वाजून 53 मिनिटांपासून सुरू होत असून 28 फेब्रुवारी 6 वाजून 14 मिनिटांपर्यंत आहे.

अमावस्या आणि दान

हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक सणाला वेगवेगळ्या वस्तू दान केल्या जातात. फाल्गुन अमावस्येला 3 वस्तू दान केल्याने भरभरून धनलाभ होतो अशी मान्यता आहे.

धनाचे दान

फाल्गुन अमावस्येला शक्य असेल तेवढ्या धनाचे दान करावे, असे केल्याने वर्षभर पैशांची कमतरता भासत नाही.

काळ्या तिळाचे दान

फाल्गुन अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांचे दान केल्याने पितरांचे आशीर्वाद लाभतात.

अन्न आणि वस्त्रांचे दान

या दिवशी अन्न आणि कपड्यांचे दान करणेदेखील लाभदायी ठरते. असे केल्याने कधीच उपासमार होत नाही.


(Disclaimer: सदर माहिती दंतकथा आणि सामन्या ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story