महिलांचा डावा डोळा फडकण्याचा अर्थ काय असतो?

Pooja Pawar
May 23,2025


महिलांचा डावा डोळा फडफडणे हे जरी सामान्य वाटत असलं तरी ज्‍योतिष आणि समुद्रशास्त्र या सामान्य वाटणाऱ्या घटनांना असामान्य मानतात आणि त्याला येणाऱ्या भविष्याशी जोडतात.


तेव्हा महिलांचा डावा डोळा फडफडणं याचा अर्थ नेमका काय? ते शुभ असते की अशुभ याविषयी जाणून घेऊयात.


महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. भविष्यात काहीतरी चांगलं घडेल असा याचा संकेत असतो.


महिलांचा डावा डोळा फडफडणं याचा अर्थ भविष्यात आर्थिक लाभ, चांगली बातमी किंवा मोठे यश इत्यादी असू शकतं. तसेच नोकरीत बढतीची बातमी देखील मिळू शकते.


महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर ज्‍योतिष आणि समुद्रशास्त्रनुसार आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासोबतच कौटुंबिक जीवनातही आनंद येऊ शकतो.


व्यवसायात यश मिळण्याची आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता असते. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे असे समजले जाते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रा आणि समुद्रशास्त्रवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story