प्रत्येकाला आनंदी राहण्याचा अधिकार असतो. पण प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून असतो. प्रत्येकाला आपला आनंद शोधायचा असतो.
पण नेहमी आनंदी व हसतमुख राहण्यासाठी या 5 सवयी आत्ताच बाळगा
आनंदी राहायचं असेल सगळ्यात पहिले म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका
इतरांच्या चुका स्वीकारणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या चुकांसह स्वीकारा
तुम्ही जसे आहात तसेच इतरांसमोरही राहा. खोटी प्रतिमा दाखवू नका. तुमचा मुळ स्वभाव जसा आहे तसाच लोकांना दाखवा
समोरच्या व्यक्तीचा सतत विचार करणे थांबवा यामुळं तुम्हालाच त्रास होईल. त्यापेक्षा तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. यातून तुम्हाला समाधान मिळेल.
इतरांना त्रास देऊन होणार आनंद हा क्षणिक असतो. त्यामुळं इतरांना त्रास न देता आपले कर्म करत राहा.