महागडा आंबा लवकर सडू नयेत म्हणून करा 'हे' 5 उपाय!

Neha Choudhary
May 06,2025


उन्हाळा म्हटला की बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे येतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आंब्यांवर ताव मारायला आवडतो.


बाजारातून दोन ते तीन डझन पेटी घरी आणल्या जातात. पण अनेक वेळा ते आंबे खराब होतात. त्यासाठी जाणून घ्या खास टीप्स


आंबा घरी आणणल्यावर काळोख्या खोलीत ठेवावा. पण ती खोली कोंडत नसावी.


तसंच कागद त्यावर पेंढ्या मग त्यावर आंबे ठेवावे. कुठला आंबा किती पिकला आहे, तसा क्रमांने तो ठेवावा.


हे आंबे ठेवताना सडके आंबे पहिले वेगळे काढून ठेवावे. तर थोडा उतरलेला आंबा हा तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.


कायम आंबा विकत घेतना तो जरा कमी पिकलेला घ्या. घरी आणणल्यावर आंबे सुक्या कपड्याने पुसून घ्यावेत.


आंबा छान राहण्यासाठी तो कागद किंवा वर्तमानपत्राने झाकून ठेवावा. कागद नसेल तर कॉटनचा फडकाही तुम्ही टाकू शकता.


शिवाय आंबा सडू नये आणि बुरशी लागू नये म्हणून त्याच्या देठापाशी लिंबाचा रस लावा.


आंबाचा रस काढून तो तुम्ही फ्रिजमध्ये वर्षभर साठवून ठेवू शकता.

VIEW ALL

Read Next Story