पावसाळ्यात छान पदार्थ घरात करुन बघितले जातात. चहासोबत सँडविच, चीला, डोसा असा पदार्थ केले जातात
मात्र अनेकदा डोसा किंवा चिला तव्यावर चिटकतो आणि मग त्याचे तुकडे होतात
यासाठीच आम्ही तुम्हाला एक टिप्स सांगणार आहोत.
पॅन गरम करुन त्यावर मीठ टाका आणि व्यवस्थित सगळीकडे पसरवा
आता मीठाचा रंग बदलल्यानंतर एका कपड्याने तव्यावरील मीठ साफ करा
आता तव्यावर थोडेसे तेल टाका जेव्हा तेल गरम होईल तेव्हा पुन्हा थोडे मीठ टाका
त्यानंतर पुन्हा एकदा तवा चांगला पुसून घ्या आणि पुन्हा थोडे तेल टाकून चांगले पसरवा
आता तुम्ही डोशाचे किंवा चिलाचे पीठ तव्यावर टाकून डोसे काढायला घ्या. आता डोसा अजिबात चिकटणार नाही
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)