निसर्गाचा नियम आहे जी गोष्ट जन्माला आली तिचा कधीना कधी नाश होणं निश्चित आहे. तसंच साधारणपणे सर्व खाद्यपदार्थ कधी ना कधी खराब होणं निश्चित आहे.
जगातील सर्व खाद्यपदार्थांची शेल्फ लाईफ असते, त्यानंतर प्रत्येक गोष्ट ही खराब होऊ लागते. पण तुम्हाला अशा पदार्थांविषयी सांगणार आहोत. ज्या वर्षानुवर्षे खराब होत नाहीत.
मध ही एक असा पदार्थ आहे जो वर्षानुवर्षे खराब होत नाही. मध जर तुम्ही योग्य प्रकारे साठवण्यात आलं तर ते वर्षानुवर्षे चांगलं खाण्यायोग्य राहतं.
एका खोदकामादरम्यान 5500 वर्षांपूर्वीचं मध सापडलं. ते मध इतक्या वर्षानंतर सुद्धा खाण्यायोग्य होतं.
मध खराब न होण्याचे कारण म्हणजे त्यात खूप कमी पाणी असते आणि त्यात असलेले नैसर्गिक घटक हे मधाला खराब होण्यापासून रोखतात.
मधाप्रमाणेच मीठ सुद्धा अनेक वर्ष खराब होत नाही.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)