संध्याकाळी जेवण बनवायला कंटाळा आला असेल तर , हा झटपट तयार होणारा 'कोळंबी भात' नक्की ट्राय करा.
'कोळंबी भात' बनवण्यासाठी बासमती तांदूळ धुवून 15-20 मिनिटे भिजत ठेवा.
एका भांड्यात तेल गरम करा. त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी द्या.
नंतर त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
त्यात आले-लसूण पेस्ट आणि मिरची घालून पुन्हा भाजून घ्या.
टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.
आता त्यात चवीनुसार हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घाला.
मसाला चांगला परतून घ्या, नंतर त्यात कोळंबी घालून 5-7 मिनिटे शिजवा.
आता भिजवलेले तांदूळ, पाणी आणि कोथिंबीर घालून एकत्र करा.
पाणी आटेपर्यंत आणि भात शिजेपर्यंत मंद आचेवर शिजू द्या.
गरमागरम कोळंबी भात कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करा.