गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस बाकी उरले आहेत. बाप्पाच्या आगमनाआधी नैवेद्यासाठी काय करायचं याची तयारी सुरू असते
नैवेद्यासाठी मोदक लाडूंव्यतिरिक्त तुम्ही पंचखाद्यदेखील दाखवू शकता. आरोग्याला पौष्टिक आणि पारंपारिक असा हा पदार्थ आहे.
काजू, सुकं खोबरं, चणा डाळ, शेंगदाणे, गूळ, पाणी, वेलचीपूड, लाह्या
सगळ्यात आधी एक कढई गॅसवर ठेवून त्यात सगळं साहित्य भाजून घ्यावे.
आता एका पातेल्यात किसलेला गुळ आणि गरजेनुसार पाणी घालून या गुळाचा पाक करुन घ्या
पाक झाल्यावर त्यात सगळे जिन्नस घालून मिक्स करावेत. त्यनंतर या मिश्रणात लाह्या घालून सगळे जिन्नस गुळाच्या पाकात मिक्स करुन घ्यावेत
बाप्पाच्या नैवेद्यासाठी पंचखाद्य तयार आहे.