गॅस लीक आहे की नाही कसे ओळखावे? अशी करा तपासणी…

गॅस सिलेंडर काळजीपूर्वक हाताळणे महत्त्वाचे

गॅस सिलेंडर वापरणे खूपच सोईस्कर झाले आहे. पण, जितके गॅस सिलेंडर वापरणे सोपे आहे तितकाच तो काळजीपूर्वक हाताळणे देखील महत्त्वाचे आहे.

पाण्याची मदत घ्या

सिलेंडरमध्ये रेग्युलेटर असलेल्या ठिकाणी थोडे पाणी टाकावे. अशा परिस्थितीत जर त्यातून बुडबुडे उठत असतील तर तुमच्या गॅस सिलेंडरमधून गळती होत असल्याचे लक्षण आहे.

वास येतो का पहा

जर तुम्हाला थोडेसेही असे वाटत असेल तर गॅस रेग्युलेटरजवळ आणि पाईप जॉइंटच्या ठिकाणी वास घ्यावा लागेल. असे केल्याने तुम्ही गॅस गळती झाली आहे का हे पाहू शकाल.

सतत चाचणी करा

गॅस सिलेंडर घरी आणताना किंवा वापरताना वेळोवेळी तपासत राहावे. इंस्टॉलेशनपूर्वी आणि वापरादरम्यान सिलिंडर गळत आहे का ते तपासत रहा.

सिलेंडर त्वरित बदला

तुमचा सिलेंडर लीक होत असल्यास वापरण्याची गरज नाही. त्यावर कॅप लावा आणि बाजूला ठेवा आणि प्रथम तुमच्या गॅस एजन्सीला त्याबद्दल कळवा. त्यानंतर ते तुमचा गॅस सिलिंडर त्वरित बदलून घेतील.

आग लागली तर

गॅल लिक झाल्यानंतर जर अचानक आग लागली तर सर्वप्रथम शांत रहा. घरातील मोठी चादर किंवा एखादे टॉवेल घेऊन ते पाण्यात भिजवा आणि सिलेंडरवर टाका. यामुळे आग विझण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story