बेडूक हा निसर्गातील खास प्राणी मानला जातो. बेडकाचं विष हे अनेक कामांसाठी वापरलं जात.
बेडकाचे विष हे आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण ठरतं. तेव्हा याचा उपयोग जाणून घेऊयात.
बेडकाच्या विविध प्रजातींच्या विषामध्ये विविध प्रकारचे विषारी पदार्थ आढळतात. या पदार्थांना 'पेप्टाइड्स' असे म्हंटले जाते. पेप्टाइड्समध्ये अतिशय गुंतागुंतीची रासायनिक रचना असते आणि त्यात अनेक जैविक गुणधर्म आढळतात.
काही पेप्टाइड्स हे पेन किलर असतात, तर काही रक्तदाब कमी करण्यासाठी मदतशीर ठरतात. काही पेप्टाइड्सचा उपयोग हृदय रोगावर उपचार करण्यासाठी केला जातो तर काहींचा उपयोग कॅन्सरच्या उपचारासाठी केला जातो.
बेडकाच्या विषाचा विष वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रकारे वापर केला जातो. बेडकाच्या विषात आढळणाऱ्या काही पेप्टाइड्स पेन किलर औषधांमध्ये वापरल्या जातात. हे पेप्टाइड्स मेंदूतील वेदनांचे सिग्नल अवरोधित करून वेदना कमी करतात.
काही पेप्टाइड्स रक्तदाब सुद्धा नियंत्रित करतात. त्यामुळे याचा वापर उच्च रक्तदाब उपचारात केला जाऊ शकतो.
बेडकाच्या विषात आढळणारे काही पेप्टाइड्स मांसपेशी मजबूत करतात आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यास मदत करतात.
काही पेप्टाइड्स कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. तसेच कर्करोगावर नवीन उपचार विकसित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)