तुम्ही रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये बसून चिली पोटॅटो खाल्लाच असेल.
आता हीच चव घरी अनुभवायची आहे. पण रेसिपी माहित नसेल, तर काळजी करू नका!
ही आहे चविष्ट आणि सोपी घरगुती चिली पोटॅटो रेसिपी.
सर्वप्रथम बटाटे सोलून त्याचे लांब काप करा. नंतर हे बटाटे गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा.
दुसऱ्या पॅनमध्ये थोडं तेल गरम करा. त्यात ठेचलेला लसूण, किसलेलं आले, सोया सॉस, टोमॅटो केचप, चिली सॉस आणि चिरलेली हिरवी मिरची घालून चांगले परतवा.
एका छोट्या वाटीत कॉर्नफ्लोअर आणि पाणी मिसळा आणि ते या सॉसमध्ये हळूहळू घाला.
आता तळलेले बटाटे त्यात घालून सगळं एकजीव करून घ्या. त्यात चिरलेली सिमला मिरची आणि कांदा घालून परता.
चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिरी घालून पुन्हा मिक्स करा. शेवटी हिरव्या कांद्याच्या पातांनी सजवा.
गरमागरम आणि खमंग चिली पोटॅटो तुम्ही स्टार्टर किंवा पार्टी स्नॅक्स म्हणून सर्व्ह करू शकता.