तूप खाण्याचे अनेक फायदे असून, चपातीला तूप लावल्यानं त्यातील कॅलरीचं प्रमाण वाढतं. विनातुपाच्या साध्या चपातीत साधारण 70 ते 100 कॅलरी असतात.
तर, एक चमचाभर तुपामध्ये म्हणजे साधारण 5 ग्रॅम देशी तुपात 45 कॅलरी असतात.
जर तुम्ही चपातीवर तुप लावल्यास त्यातील कॅलरीची संख्या 115 ते 145 वर पोहोचतात.
शुद्ध साजूक तुपामुळं शरीराला उर्जेचा पुरवठा होतो. वजन वाढवम्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांसाठी तूप हा एक उत्तम पर्याय आहेत.
कोणीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असेल तर त्यांनी कमी प्रमाणात तुपाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
चपातीला जास्त तूप लावल्यास कॅलरी झपाट्यानं वाढतात आणि त्यामुळं स्थुलता वाढण्याचा धोका असतो.
एका लहानशा चपातीवरही जर अर्धा चमचा तूप लावलं तर, 20 ते 25 कॅलरी वाढतात. दर दिवशी दर तीन ते चार तूप लावलेल्या चपात्या खाल्ल्या तर, जेवणात 150 ते 200 कॅलरी वाढतात.