आज बॉयफ्रेंड हा शब्द फारच वरचे वर वापरला जातो. हा शब्द रोजच्या वापरातील शब्दांपैकी एक झालाय.
खरं तर सुरुवातीला बॉयफ्रेंड हा शब्द पुरुष मित्र या अर्थानेच वापरला जायचा.
बॉयफ्रेंड या शब्दाचा उत्पत्तीच्या वेळेचा अर्थ आजच्या अर्थापेक्षा फारच वेगळा होता हे विशेष!
एक पुरुष माझा चांगला मित्र आहे हे सांगण्यासाठी त्यावेळी मुली/महिला/तरुणी बॉयफ्रेंड हा शब्द वापरायच्या.
मात्र काळ बदलत गेला तसा बॉयफ्रेंड या शब्दाचा वापर असा पुरुष ज्याच्यासोबत रोमँटिक रिलेशन आहे अशा अर्थाने केला जाऊ लागला.
20 व्या शतकांमध्ये तर बॉयफ्रेंड शब्दाच्या वापरामध्ये अमुलाग्र बदल झाल्याचं पहायला मिळालं.
बॉयफ्रेंड शब्दाचा वापर प्रेम आणि डेटिंगसाठी ज्या पुरुषासोबत आपण आहोत असा पुरुष म्हणून केला जाऊ लागला.
मात्र फार कमी लोकांना ठाऊक आहे की 'Boyfriend' (बॉयफ्रेंड) या शब्दाचा वापर पहिल्यांदा 1822 साली करण्यात आल्याची नोंद उपलब्ध आहे.
म्हणजेच बॉयफ्रेंड हा शब्द मागील 203 वर्षांहून अधिक जुना आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)