भारतात मिठाईचं, नमकीन पदार्थांचं दुकान असो किंवा अगदी वडापावची गाडी असो, तिथं समोसासुद्धा विकला जातो.
एखादा कायक्रम असो वा एखादा सोहळा, भारतीयांची समोसाला कायमच पसंती असते.
आवडीनं खाल्ल्या जाणाऱ्या याच समोसाला इंग्रजीत काय म्हणत असतील हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
समोसा या पदार्थाला इंग्रजीतही समोसाच म्हणतात. तर काहींच्या मते इंग्रजीत त्याला रिसोल असं म्हणतात.
याशिवास समोसाला असणारं आणखी एक नाव म्हणजे 'सेवरी स्टफ्ड पेस्ट्री'.
समोसासाठी वापरलं जाणारं आवरण हे पेस्ट्री म्हणून संबोधलं जातं. तर, त्याच्या तिखट लज्जतदार चवीसाठी सेव्हरी शब्दाचा वापर होतो.
मैदा किंवा गव्हाच्या पीठाच्या एका आवरणात चवीष्ट मिश्रण भरून हा समोसा तळला जातो आणि अनेकांच्या जीभेचे चोचले पुरवतो.