अलीकडे ORS संदर्भात वाद निर्माण झाला आहे कारण काही कंपन्या आणि राज्य सरकारांकडून ORS चे ब्रँडिंग आणि वितरण पद्धत यावर मतभेद दिसून आले.
काही ठिकाणी WHO मान्यताप्राप्त प्रमाणापेक्षा वेगळे घटक वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ORS असं नाव आपण नेहमीच ऐकलंच असेल पण तुम्हाला त्याचा फुल फॉर्म माहितेय?
ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (Oral Rehydration Solution)
मराठीत याचा अर्थ तोंडावाटे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणारे द्रावण असा होतो.
ORS मध्ये पाणी, साखर (ग्लुकोज), मीठ (सोडियम क्लोराईड), पोटॅशियम आणि सोडियम सिट्रेट असते.
हे द्रावण अतिसार, उलटी, ताप, उष्माघात किंवा डिहायड्रेशनच्या वेळी शरीरातील पाण्याचे आणि मिठाचे प्रमाण संतुलित ठेवते.