पाऊस लिटरमध्ये न मोजता मिमीमध्ये का मोजला जातो?

Tejashree Gaikwad
Jun 02,2025


पाऊस किती पडला? याची बातमी देताना किंवा सांगताना नेहमी मिलीमीटर संगितले जाते.


साधारणपणे पाऊस मिमी मध्ये मोजला जातो. पाऊस मोजण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय मानक आहे.


जगभरात पावसाचे मोजमाप अशा प्रकारे केले जाते कारण या युनिटचा वापर करून पावसाचे प्रमाण समजणे सोपे आहे.


जर आपण म्हणतो की १ मिमी पाऊस पडला आहे तर याचा अर्थ असा की १ चौरस मीटरवर १ लिटर पाणी पडले आहे. यामुळे किती पाऊस पडला हे समजणे सोपे होते.


पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापकाचा वापर सर्वाधिक केला जातो. हे पाऊस मोजण्याची सर्वात जुनी पद्धत आहे.


पर्जन्यमापक हे एक साधे उपकरण आहे. त्याला एक काचेची बाटली जोडलेली असते. त्यावर स्केल लिहिलेले असते आणि ते मोकळ्या जागी ठेवलेले असते.


पर्जन्यमापक पर्जन्यमान मिमी किंवा इंचांमध्ये मोजतो. म्हणूनच हे प्रमाण आंतरराष्ट्रीय बनले. पण, सध्या, पावसाचे मोजमाप इतर अनेक प्रकारे केले जात आहे.

VIEW ALL

Read Next Story