टॉवेलवर ही पट्टी का असते? कधी कोणी सांगितलाय याचा वापर?

Published by: Sayali Patil | Mar 21, 2025

टॉवेल

टॉवेल... रोजच्या वापरातील वस्तू. पण, याच टॉवेलच्या दोन्ही टोकांपाशी काही अंतर सोडून काहीशा रुंद अशा बॉर्डर किंवा पट्ट्या असतात.

Published by: Sayali Patil | Mar 21, 2025

प्रश्न

या पट्ट्यांचा नेमका वापर माहितीये? X या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनं याबाबतचा प्रश्न नेटकऱ्यांना केला आणि तेसुद्धा पेचात पडले. अनेकांनी मग या प्रश्नाची तितकीच वेगवेगळी उत्तरं दिली.

Published by: Sayali Patil | Mar 21, 2025

घडी

चांगली बॉर्डर असल्यास टॉवेलची घडी व्यवस्थित बसते असं कारण काहींनी दिलं.

Published by: Sayali Patil | Mar 21, 2025

वापर

एका युजरनं दिलेल्या उत्तरानुसार त्या पट्टीबाहेरील लहान भाग हात पुसण्यासाठी आणि मध्ये असणारा मोठा भाग हा शरीर पुसण्यासाठी वापरतात. एका युजरच्या मते ही बॉर्डर किंवा पट्टी टॉवेल व्यवस्थित वाळण्यास मदत करते.

Published by: Sayali Patil | Mar 21, 2025

बॉर्डर

nypost च्या माहितीनुसार या बॉर्डरला 'डॉबी बॉर्डर' असं म्हटलं जातं. अमेरिकी टॉवेल विक्रेता 'टॉवेल हब'च्या माहितीनुसार ही पट्टी निव्वळ सजावटीच्याच हेतूनं तिथं असते.

Published by: Sayali Patil | Mar 21, 2025

लूक

'डॉबी बॉर्डर'मुळं टॉवेलला एक चांगला लूक मिळतो आणि टॉवेल व्यवस्थित पकडता येतो.

Published by: Sayali Patil | Mar 21, 2025

VIEW ALL

Read Next Story