भुवया (आइब्रो) आपल्या व्यक्तिमत्त्वाला उठावदार करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात.
त्यामुळे अनेक महिलांना आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकारात भुवया बनवायला आवडतात.
पण अनेकदा असं होतं की थ्रेडिंग केल्यानंतर कपाळावर लाल पुरळ येतं. अशावेळी काही घरगुती उपाय करून या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.
जर थ्रेडिंगनंतर कपाळावर पुरळ आले असतील, तर तुम्ही बर्फाचा वापर करू शकता. थोडा बर्फ कपड्यात गुंडाळून त्या जागेवर हलकेच फिरवावा. त्यामुळे त्वचेची सूज आणि लालसरपणा कमी होऊ शकतो.
थ्रेडिंगनंतर अॅलोवेरा जेल लावणं उत्तम पर्याय ठरतो. यामुळे त्वचा थंड राहते आणि पुरळ होण्याची शक्यता कमी होते.
कच्चं दूध आणि मध एकत्र करून लावल्यास पुरळ कमी होऊ शकतात तसेच त्वचेवरील लालसरपणाही कमी होतो.
थ्रेडिंग केल्यानंतर शक्यतो सूर्यप्रकाशापासून थोडं दूर रहा आणि वारंवार चेहऱ्याला हात लावू नका. यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते.