मटारची साल कचरा समजून फेकताय? थांबा... बनवा हेल्दी डिश

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात मटार येतात. जे खायला स्वादिष्ट आणि पौष्टिक सुद्धा असतात.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

अनेकजण मटारच्या दाण्यांची भाजी करतात आणि त्याच्या साली कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

पण मटारची सालं कचराकुंडीत फेकून न देता त्यापासून तुम्हाला चांगली हेल्दी रेसिपी बनवता येते.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

मटारची साल नीट स्वच्छ करा आणि त्यांच्या बाजूंच्या दोऱ्या काढून टाका. वाटाण्याच्या साली 2 तास पाण्यात भिजत ठेवा, यामुळे साली मऊ होतील.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

एक कुकर घ्या आणि मटारच्या दाण्यांसोबत भिजत घातलेल्या साली, शुद्ध आणि बटर टाकून 3 ते 4 शिट्या करून घ्या.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सर जारमध्ये ठेवा आणि बारीक वाटून पातळ पेस्ट बनवून घ्या. बारीक गाळणीने घालून घ्या त्यानंतर कढईत गरम करा.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

मग उकळी आली की चवीनुसार त्यात मीठ आणि मिरपूड घाला. यासह हेल्दी सूप तयार होतं.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

मटारच्या सालींमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचन सुधारते. तसेच तुम्हाला या सूपमधून व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी मिळेल.

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Dec 08, 2025

VIEW ALL

Read Next Story