जगभरात सफरचंदला सुपरफूड म्हणून ओळखलं जातं . परंतु तीन वेगवेगळ्या रंगाचे सफरचंदमध्ये बाजारात मिळतात.
हिरवा, लाल आणि पिवळा अशा तीन रंगांचे सफरचंद बाजरात मिळतात. तेव्हा यापैकी कोणत्या रंगाचं सफरचंद आरोग्यासाठी चांगलं असतं याविषयी जाणून घेऊयात.
हिरव्या रंगाचं सफरचंद फायबल आणि कमी ग्लुकोजसाठी ओळखलं जातं. यात साखरेचं प्रमाण कमी असतं आणि एंटीऑक्सिडेंट्स जास्त असतात.
हिरव्या रंगाचं सफरचंद पचनक्रिया सुधारतं. भुकेला कंट्रोल करतं, ब्लड शुगर स्थिर ठेवण्यात मदत करतं. डायबेटिज आणि वजन कमी करण्यासाठी हिरवं सफरचंद एक चांगला पर्याय आहे.
लाल रंगाच्या सफरचंदमध्ये फ्लेवोनॉयड्स आणि पॉलिफिनॉलचं प्रमाण जास्त असतं. यातील एंटीऑक्सिडेंट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी स्किन ग्लोइंगसाठी सफरचंद मदत करतात.
लाल रंगांच्या सफरचंदमध्ये नॅचरल शुगर असते त्यामुळे हे सफरचंद त्याच्या चवीसाठी सुद्धा ओळखले जाते.
पिवळ्या सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्सची मात्रा असते. हे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचं काम करतं. तसेच डोळ्यांच्या दृष्टीसाठी सुद्धा चांगलं मानलं जातं.
पिवळं सफरचंद जास्त गोडं नसतं किंवा जास्त आंबट सुद्धा नसतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)