शिळ्या पोळ्यांपासून कधी चिवडा किंवा लाडू बनवला जातो. पण तुम्ही शिळ्या पोळ्यांपासून गुलाबजामदेखील बनवू शकता
कमी पदार्थ वापरून झटपट हे गुलाबजाम तयार होतात. याची रेसिपी पाहा
शिळ्या चपात्यांचे तुकडे करुन ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर यात एक गरम दूध आणि वेलची पूड टाकून हे मिश्रण भिजत ठेवा
आता या मिश्रणात तूप व अर्धा चमचा बेकिंग पावडर व चिमूटभर मीठ घाला. त्यानंतर यात 1.5 कप मिल्क पावडर टाकून चांगले मळून घ्या
त्यानंतर गोल किंवा अंडाकृती अशा आकाराचे गोळे करुन घ्या. व नंतर तेलात तळून घ्या.
नंतर साखरेचा पाक तयार करुन त्यात ते तळलेले गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून द्या
10 मिनिटांत चमचमीत गुलाबजाम तयार आहेत.