शिळी पोळी उरली की त्यापासून काय बनवायचे असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही एक नवीन डिश ट्राय करुन पाहाच
कमी पदार्थांमध्ये तुम्ही कापसासारखे मऊ गुलाबजाम बनवू शकणार आहात, पाहा रेसिपी
शिळ्या चपात्यांचे तुकडे मिक्सरमधून बारीक करुन घ्या. आता यात एक कप गरम दूध आणि वेलची पूड टाकून तासभर भिजत ठेवा
आता या मिश्रणात तूप आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून चिमूटभर मीठ टाका. यात आता 1.5 कप मिल्क पावडर टाकून मळून घ्या
त्यानंतर आता या पीठाचे चांगले गोळे मळून घ्या आणि तेलात तळून घ्या
आता साखरेचा पाक तयार करुन त्यात तळलेले गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून द्या
तुम्ही एखाद्या सणालादेखील गुलाबजाम घरी करू शकता