उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे.
त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण रात्री झोपताना सुद्धा आंघोळ करतात.
रात्री आंघोळ करणाऱ्या लोकांचं म्हणणं असतं की यामुळे शरीर थंड होतं आणि झोप छान लागते.
रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो आणि फ्रेश वाटतं.
रात्री आंघोळ केल्यामुळे ताण आणि चिंता कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. घाम आणि शरीराची दुर्गंधी दूर झाल्याने शरीराला चांगला आराम मिळतो.
पण हे फायदे असले तरी काही लोकांसाठी रात्री आंघोळ करणं हानिकारक ठरतं. आंघोळ केल्यावर लगेचच लोकांना थकवा, स्ट्रेस दूर होतो मात्र थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे झोप सुद्धा बिघडू शकते.
त्यामुळे रात्री आंघोळ करून झोपण्याची सवय ही चांगली की वाईट ते प्रत्येक व्यक्तीच्या अवलंबून असते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)