केसांना गरम तेलाच्या मसाजचे 'हे' फायदे

तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते.

तेलाची निवड

आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.

कोमट तेलाने मालिश

केसांना मालिश करण्यासाठी नेहमी कोमट तेल लावा.

केसांच्या मुळांना तेल लावा

केसांना तेल लावताना नेहमी केसांच्या मुळांपासून तेल लावा. हाताच्या बोटांच्या सहाय्याने टाळूवर हलके तेल लावून १० मिनिटे मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो.

गरम टॉवेल गुंडाळा

टाळूला आणि केसांना पूर्णपणे तेल लावल्यानंतर, गरम टॉवेलमध्ये केस गुंडाळून वाफ घेतल्यावर तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते.

शॅम्पू

शॅम्पू केल्यानंतर केसांमध्ये तेल रात्रभर किंवा कमीत कमी २ तासासाठी लावावे. यानंतर केस चांगल्या शाम्पूने धुवावेत.

कंडिशनिंग

शॅम्पूनंतर कंडिशनिंग केल्याने केस चमकदार आणि हायड्रेटेड राहतात.

नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या

केस नैसर्गिकरित्या कोरडे होऊ देणे केव्हाही चांगले. हेअर ड्रायरने केस सुकवणे किंवा टॉवेलने घासणे टाळा.

नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हेअर पॅक महिन्यातून एकदा केसांना व्हॉल्यूम आणि बाऊंस करण्यासाठी लावू शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story