लग्न ही एक अशी परंपरा आहे जी दोन व्यक्तींना एकत्र आणते. दोन व्यक्तींचा संसार आनंदाची बाब आहे.
लग्न करायला अनेक लोकं घाबरतात कारण लग्नानंतर संपूर्ण आयुष्य बदलतं.
लग्न होताना फक्त नवरा-बायकोचं नाही तर दोन कुटूंब एकत्र येतात.
जेव्हा दोन लोक लग्न करतात तेव्हा अनेक गोष्टी घडतात जिथे कुटुंबाचा उल्लेख केला जातो. अशा परिस्थितीत शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे नियम असतात. म्हणून एखाद्याला आपल्यापेक्षा कमी दर्जाचे म्हणणे चुकीचे आहे.
वैवाहिक नातं खूप नाजूक असतं, त्यामुळे भांडणं जितकी कमी होतात तितकं पती-पत्नीसाठी चांगलं असतं. जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा अशा गोष्टी घडतात ज्या राग आणि संतापाचे कारण बनतात यात शंका नाही.
लग्न टिकवायचं असेल तर जोडीदाराची स्टाइल ओळखा. नवरा बायकोमध्ये रोमान्स असणे गरजेचे आहे. एकमेकांच्या गरजा ओळखा. प्रत्येक दाम्पत्य वेगळे असतात.