अनेकांनी अनेक अशा मंडळींना पाहिलं असेल, जे झोपेत अचानक बडबडू लागतात. या सवयीमुळं शेजारी झोपणाऱ्या व्यक्तीचीसुद्धा झोप मोडते किंवा त्यांना भीती वाटते.
पण, कोणीही व्यक्ती झोपेत का बडबडते, यामागे काही महत्त्वाची कारणं असून ती समजून घेणं महत्त्वाचं आहे.
झोपेत बोलण्याच्या सवयीला 'पॅरासोमनिया' म्हणतात. या स्थितीस कैक घटक कारणीभूत ठरतात.
अनेकांच्या मते व्यक्ती जी स्वप्न पाहतात त्याचसंदर्भात बोलतात. तर काहींच्या मते थकवा, अनिद्रा, तणाव, मद्यपान, ताप अशा कारणांमुळेही माणसं झोपेत बोलू लागतात.
झोपेत बोलण्याची सवय मोडायची असल्यास त्या व्यक्तींनी पुरेशी झोप घेणं, कॅफिनयुक्त पदार्थांचं सेवन टाळणं, मद्यपान न करणं अशा सवयी अंगीकाराव्यात.
प्रथमदर्शनी या अतिशय सामान्य सवयी असल्या तरीही शरीरावर मात्र त्याचे गंभीर परिणाम होत असतात ही बाब नाकारता येणार नाही.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खाजरमा करत नाही. आरोग्यविषयक प्रश्नांसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)