असं म्हणतात की शरीर, प्रकृती उत्तम असण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिक स्थितीसुद्धा तितकीच उत्तम असणं गरजेचं आहे. शरीर आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही पोषक तत्त्वांची पूर्तता अतिशय महत्त्वाची असते.
शरीर आणि मानसिक आरोग्यामध्ये एक अदृश्य नातं असून ते दोघंही एकमेकांसाठी काम करत असतात.
लक्षात घ्या, शरीरात विटामिन बी12 ची कमतरता असल्यास अनेकदा नकारात्मक विचार मनात घर करतात.
हे एक असं जीवनसत्त्वं आहे जे शरीरातील अनेक क्रियांवर परिणाम करत असून, शरीरातील अनेक रसायनांच्या निर्मितीसाठी मदतही करतं.
विटामिन बी 12 मुळंच आपला मेंदू योग्य रितीनं काम करतो. मात्र त्याची कमतरता असल्यास सतत विचार बदलणं, नैराश्य येणं, मानसिक अस्थैर्य अशा समस्या भेडसावतात.
सततचा थकवा, नकारात्मक विचारही या विटामिनच्या कमतरतेमुळं शरीरावर परिणाम करतात.
मानसिक आणि शारीरिक स्थितीमध्ये सांगड घालणाऱ्या या विटामिनसंदर्भातील सुयोग्य माहिती आणि मार्गदर्शन डॉक्टरांकडून अवश्य घ्या.