नखांवर दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या रेषेला ल्यूकोनीशिया असं म्हणतात.
या रेषा अनेक कारणांमुळे तयार होतात. मात्र अशा रेषा दिसणं ही काही चिंतेची बाब असतेच असं नाही. या रेषा का तयार होतात पाहूयात...
एखादं काम करताना तुमच्या नखाला काही दुखापत झाली तर अशी पांढऱ्या रंगाची रेष तयार होते. जखम भरते तशी ती रेष हळूहळून पुसट होऊन निघून जाते.
कधी कधी शरीरामध्ये कॅल्शियम किंवा झिंकचं प्रमाण कमी झाल्यानंतर नखांवर पांढऱ्या रंगाचे डाग अथवा रेषा दिसू लागतात.
नेल पॉलिश, हार्डनर किंवा रिमुव्हरमधील रसायनांची एलर्जी असेल तरीसुद्धा नखांवर अशा पांढऱ्या रेषा दिसू शकतात.
काही फंगल इन्फेक्शन म्हणजेच बुरशीचा संसर्ग झाला तरी नखांवर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे डाग दिसतात.
काही केमोथेरीपीच्या औषधांमुळे नखांवर परिणाम होऊ शकतो. अशा औषधांमुळेही अनेकदा नखांवर पांढऱ्या रेषा दिसतात.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)