भात खावून वजन कमी करा, शिजवण्याची ही पद्धत आहे बेस्ट

महाराष्ट्रातील घरांमध्ये प्रमुख पदार्थ म्हणजे भात. पण डाएटच्या जमान्यात अनेकदा भात न खाण्यास सांगितले जाते

Mansi kshirsagar
Mar 12,2024


भातात असलेल्या स्टार्जमुळं अनेकजण रात्रीचा भात खाणे टाळतात.


ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलमुळंही अनेक जण भाताचे सेवन करणे टाळतात. भातामुळं वजनदेखील वाढते, असं सांगण्यात येते.


आरोग्यतज्ज्ञांनुसार, योग्य पद्धतीने भात शिजवल्यास वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर आरोग्यासाठीही फायदेशीर राहते


कारण, भात ग्लुटेन फ्री असतो. त्यात आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन बीसारखे गुणधर्म असतात. ज्याची शरीराला गरज असते


भात खाताना त्यातील स्टार्चची मात्र कमी करणे गरजेचे आहे. असं केल्यास तुम्ही लठ्ठपणा, मधुमेही, पीसीओडी आणि थायरॉइडसारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो


त्यामुळं सर्वात पहिले तांदूळ थोडेसे भाजून घ्या त्यात थोडे मीठ आणि तूप टाका


त्यानंतर त्यात पाणी टाकून शिजवून घ्या. काहीच वेळात भाज शिजून तयार


हा भात तुम्ही भाजी व वरणासोबत खावू शकता.

VIEW ALL

Read Next Story