आपल्या जोडीदाराने आपली काळजी घ्यावी, असा विचार मुली करत असतात. तिच्या काळजीपोटी तुम्ही केलेला एखादा कॉल अथवा मेसेज तिला याची अनुभूती देतो.
सर्वांच्या आयुष्यात भूतकाळ असतो. मुली या गोष्टींवरदेखील पूर्ण लक्ष देऊन असतात. जोडीदाराच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट जाणून घेण्यात मुलींना रस असतो.
आपले म्हणणे पूर्णपणे ऐकून मगच जोडीदाराने प्रतिक्रिया द्यावी, अशी मुलींची इच्छा असते. अर्धवट ऐकून सल्ला दिल्यास ते योग्य ठरणार नाही. कारण जोडीदाराचे असे वागणे मुलींना सहन होत नाही.
सुरुवातीला अखंड प्रेमात असलेले कालांतराने आपल्या जोडीदाराला दुर्लक्षित करण्यास सुरुवात करतात. परिणामी दोघांमधला प्रेमाचा नाजूक धागा हळूहळू तुटू लागतो.
मुलींना केवळ कौतुक केलेलेच आवडते असे मुळीच नाही. त्यावर आपल्यातील कमतरता जाणून घ्यायलादेखील त्यांना आवडते.
पुरुषांच्या शरीराचा गंध स्त्रियांना आवडत असल्याची माहिती याबाबतच्या एका पाहणीतून समोर आली आहे. यामुळे त्यांच्या मनात आराम मिळाल्याची भावना निर्माण होते.