हार्टमध्ये ब्लॉकेज झाल्यास दिसतात 6 लक्षण, अजिबात दुर्लक्ष करू नका

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊन रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

छातीत वेदना :

छातीत अधूनमधून दबाव जाणवणे, जळजळ होणे इत्यादी हार्ट ब्लॉकेजची सामान्य लक्षण असू शकतात. याला बऱ्याचदा 'एनजाइना' असं सुद्धा म्हणतात. ही वेदना कधीकधी खांद्यावर, हातावर किंवा पाठीवर पसरू शकते. असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांना दाखवा.

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

श्वास घेण्यात अडचण :

थोडं चालल्याने किंवा जिन्यावरून चढ उत्तर केल्याने श्वास घेण्यात अडचण येत असेल किंवा धम लागत असेल तर हे हार्ट ब्लॉकेजचं संकेत आहे. ब्लॉकेजमुळे हृदयाला ऑक्सिजन पुरवण्यात अडचण येते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

थकवा :

धमन्यांमध्ये अडथळ्यामुळे शरीराला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे अतिरिक्त थकवा जाणवतो. दिवसभर थकवा येणे, झोप पूर्ण झाल्यावर सुद्धा अशक्तपणा येणे हे हार्ट ब्लॉकेजची लक्षणं आहेत.

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

चक्कर येणं :

ब्लॉकेजमुळे धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात ज्यामुळे रक्तप्रवाह मेंदूपर्यंत योग्यपद्धतीने होत नाही. त्यामुळे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे सारख्या समस्या होते.

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

पायांमध्ये सूज येणं :

हार्टमध्ये ब्लॉकेज आल्याने पायांमध्ये सूज येऊ शकते. हार्ट ब्लॉकेज शिवाय हे हार्ट फेल्युअरचे सुद्धा संकेत असू शकतात.

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

खूप घाम येणं :

उष्णता किंवा व्यायामाशिवाय वारंवार घाम येणे हे देखील हार्टमध्ये ब्लॉकेजचे लक्षण असू शकते. हृदयावर वाढलेला दाब आणि अडथळ्यामुळे ही स्थिती उद्भवते. विशेषतः छातीत दुखण्यासोबत घाम येणे हे गंभीर धोक्याचे संकेत असतात.

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Aug 16, 2025

VIEW ALL

Read Next Story