पावसाळ्यात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या या आहेत काही सोप्या पद्धती

Intern
Jul 05,2025

तुळस आणि आल्याचा चहा

सर्दी आणि खोकल्यापासून लांब राहायचे असल्यास तुळस आणि आलं घातलेला चहा खूप फायदेशीर ठरतो.

हळद घातलेले दूध

रोज रात्री गरम दुधामध्ये हळद घालून ते दूध प्यायल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते.

फळांचे सेवन करणे

हंगामी फळे जसे की पपई,संत्र,पेरू या फळांचे सेवन करू शकता, कारण या फळांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते.

लसूण आणि मध

सकाळी रिकामी पोटी एक चमचा मध आणि लसूण खाल्याने ते आपल्या शरीरासाठी एंटीबायोटिकचे काम करते.

सुकामेवा

बदाम,अकरोड सारख्या सुक्यामेव्यांमुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.

भिजलेले मूग आणि चणे

सकाळी नाश्त्यामध्ये भिजलेले मूग आणि चणे खाल्याने शरीराला ताकद मिळते.

कोमट पाणी

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोमट पाणी पिणे आवश्यक असते.

योगा आणि प्राणायम

दररोज १५-२० मिनीटे योगा आणि प्राणायम केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.


(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story