हिवाळ्यात थंडीमुळे बऱ्याचदा पायांना भेगा पडतात. जर तुम्हाला सुद्धा अशी समस्या जाणवत असेल तर काही घरगुती उपाय तुम्ही नक्की करू शकता.
एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मीठ घाला. त्यात तुमचे पाय 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे टाचांची डेड स्किन निघून जाईल.
लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. झोपण्यापूर्वी ही पेस्ट तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना लावा आणि मोजे घाला. यामुळे थंडीत टाचांना भेगा पडण्याची समस्या दूर होते.
मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. भेगा पडलेल्या टाचांसाठी मध मॉइश्चरायझर म्हणून काम करते. तुम्ही कोमट पाण्यात मध मिसळून 20 मिनिटे पाय त्यात बुडवू शकता.
झोपण्यापूर्वी नारळाचे तेल गरम करून टाचांवर मालिश करा. त्यातील दाहक-विरोधी गुणधर्म आणि ओलावा रुक्षण झालेल्या त्वचेला जलद बरे करण्यास मदत करतो, ज्यामुळे भेगा कमी होतात.
तांदळाच्या पिठामध्ये मध आणि सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून पेस्ट तयार करा. या मिश्रणाने तुमच्या टाचांना हळूवारपणे घासून घ्या. हे डेड स्किन काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरते.
ओटमील आणि ऑलिव्ह ऑइल समान प्रमाणात मिसळून पेस्ट बनवा. ती पेस्ट ३० मिनिटे भेगा पडलेल्या टाचांवर लावा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)