हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांची त्वचा खराब होते. त्यामुळे चमकदार त्वचा हवी असेल तर पुढील उपाय ट्राय करा.
कोरफडीचे जेल त्वचेसाठी वरदान मानले जाते. ते लावल्याने डाग कमी होऊन त्वचा उजळते.
तसेच बेसन आणि क्रीम पॅक चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतो. यामुळे मृत त्वचा निघून जाते.
चंदनाचा फेस पॅक देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे आणि डाग कमी होतात.
मध-साखर याच्या स्क्रबमुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा मऊ आणि चमकदार राहते.
दुध-गुलाबाचे पाणी हे त्वचा स्वच्छ आणि चमकदार ठेवते. यामुळे डाग कमी होतात आणि त्वचा मऊ होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)