थंडीत सांधेदुखीशी संबंधित आजार वाढतात. पण काही घरगुती उपाय तुम्हाला यापासून आराम देऊ शकतात.
मेथीच्या बिया खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. रात्रभर पाण्यात बिया भिजवून सकाळी रिकाम्या पोटी चावल्याने सांधेदुखीची वेदना आणि सूज कमी होते.
मोहरी किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या शिजवा. मग कोमट तेलाने वेदनादायक भागाची मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात.
एका ग्लास कोमट दुधात एक चमचा हळद पावडर आणि चिमूटभर काळी मिरी मिसळून झोपण्यापूर्वी प्या. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास देखील मदत होते.
दररोज सकाळी आल्याला बारीक करून त्याची चहा किंवा काढा प्यायल्याने सांधेदुखी कमी होते.
ओव्याच्या बिया एका तव्यावर हलकं गरम करा आणि त्यांना सुती कापडात गुंडाळा जेणेकरून त्यांचा गठ्ठा तयार होईल. हा गठ्ठा वेदनादायक भागावर लावा.
एक कप एप्सम सॉल्ट कोमट पाण्यात विरघळवून त्यात तुमचे पाय 15 ते 20 मिनिटे बुडवा. यामुळे सांधेदुखी पासून आराम मिळू शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)