हिवाळ्यात त्वचा फुटते? वापरा 'हे' घरगुती उपाय

Pooja Pawar
Dec 01,2025


हिवाळ्यात बऱ्याचदा थंडीमुळे त्वचा फुटते आणि रुक्ष होते. अशावेळी त्वचेची चमक निघून जाते.


थंडीत त्वचा मुलायम रहावी आणि ग्लो कायम राहावा यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.


मलई आणि मधाचा फेसपॅक : एक चमचा मलाई आणि एक चमचा मध एकत्र मिक्स करून ती चेहत्यावर आणि त्वचेवर लावा. त्यानंतर हा फेसपॅक १५ मिनिटांनी धुवून टाका.


कोरफड : झोपण्यापूर्वी चेहत्यावर कोरफडीचा अर्क लावल्याने त्वचेतील कोरडेपणा दूर होतो.


खोबरेल तेल आणि तूप : त्वचा किंवा ओठ फुटलेले असतील तर तूप किंवा खोबरेल तेल लावा. यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते.


मध आणि काकडी फेसपॅक : मध आणि काकडीचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो. हिवाळ्यात कोमट पाण्याने चेहरा धुवा.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी किंवा त्वचेवर लावण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story