दाताची स्वच्छता योग्य प्रकारे राखली नाही तर हिरड्या सडून जाऊ शकतात. दातदुखीला कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून दररोज गुळण्या केल्यास आराम मिळतो.
लवंग कुटून दातांवर लावल्याने दातदुखीची समस्या दूर होते. यामुळे दात दुखत असेल तर तो देखील कमी होतो. लवंगाचे तेल देखील दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात.
कोरफड अँटी बॅक्टेरियल गुणांनी संपन्न असते. हे तेल लावल्याने दात अगदी मोत्यासारखे चमकतात. दातांवर काही काळ हे तेल लावा आणि मग दात स्वच्छ करून घ्या.
पेरूची पाने चावल्याने दातदुखी आणि हिरड्यांचा त्रास कमी होतो. पेरुची पाने कोमट पाण्यात अकळून त्याच्या गुळण्या केल्यासही फरक पडतो.
हळद आणि पाणी एकत्र मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टला ब्रशसोबत दातांवर लावा. दातांचा पिवळेपणा आणि कॅविटी कमी होतील.
स्ट्रॉबेरीमधील नैसर्गिक गुण दातांवरील पिवळेपणा कमी करतो. दातदुखीचा त्रास होत असेल तर दातांवर स्ट्रॉबेरी घासल्यास फायदा होतो.