कांदा कापल्यानंतर हाताचा उग्र वास जात नाहीये? करून पाहा ‘हे’ उपाय

Sayali Patil
Jun 06,2025

कांदा

कांदा कापल्यानंतर बराच वेळ तो उघड्यावर ठेवला तर त्यातून उग्र वास येण्यास सुरुवात होते. हातांनाही कांद्याचा हा उग्र वास टिकून राहतो.

सल्फरयुक्त घटक

कांद्याचा हा वास त्यात असणाऱ्या सल्फरयुक्त घटकांमुळे येतो आणि तो टिकून राहतो.

मीठ

हाताला कांद्याचा वास येते असल्यास मीठानं हात धुवावेत. उग्र वास दूर होतो.

मीठाचा वापर

कांदा कापल्यानंतर हात ओला करून त्यावर मीठ चोळून हात स्वच्छ धुवून घ्यावेत.

दुथपेस्ट

कांद्याचा वास घालवण्यासाठी हात दुथपेस्ट किंवा माऊथवॉशनं धुवावेत.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसानं हात धुतल्यासही कांद्याचा उग्र वास नाहीसा होतो.

कॉफी बिन्स

कॉफी बिन्स हातावर चोळून त्याचा स्क्रब म्हणून वापर केल्यास कांद्याचा उग्र वास नाहीसा होतो.

VIEW ALL

Read Next Story