घरच्या घरी बनवा टेस्टी शेजवान चटणी; 15 मिनिटात होईल तयार

Published by: Zee Team | Mar 17, 2024

अनेक डिशेस तयार करण्यासाठी वापरली जाणारी शेजवाण चटणी घरी देखील तयार करु शकता.

Published by: Zee Team | Mar 17, 2024

बेडगी किंवा काश्मिरी मिर्ची, आलं, लसूण, मीठ, सोया सॉस, व्हिनेगर आणि तेल इतकं साहित्या तुम्हाला लागणार आहे.

Published by: Zee Team | Mar 17, 2024

सर्व प्रथम मिरच्या 5 मिनीट पाण्यात भिजत ठेवा. यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन भिजवलेल्या मिरच्या त्यात एक ते दोन मिनीट उकळून घ्या.

Published by: Zee Team | Mar 17, 2024

उकळलेल्या मिरच्या काढून पाणी फेकून द्या. यानंतर या मिरच्या थोड्या स्मॅश करा.

Published by: Zee Team | Mar 17, 2024

एका पॅनमध्ये तेल घेवून त्यात बारीक चिरलेला लसूण तसेच आलं चांगलं परतून घ्या. यात स्मॅश केलेल्या मिरच्या घालून हे सर्व मिश्रण दोन मिनीट चांगले परता.

Published by: Zee Team | Mar 17, 2024

या परतलेल्या मिरची आणि आल, लसून याच्या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला. यानंतर यात चमचाभर व्हिनेगर आणि सोया सॉस घाला. ऑप्शन म्हणून टोमेटो सॉस देखील टाकू शकता. शेजवान चटणी तयार आहे.

Published by: Zee Team | Mar 17, 2024

तयार शेजवान चटणी काचेच्या बरणीत भरुन ठेवा. ही चटणी महिनाभर टिकते.

Published by: Zee Team | Mar 17, 2024

VIEW ALL

Read Next Story