विमानाचा प्रवास आरामदायी आणि कमी वेळात होणारा असतो.
तुमच्याही मनात हा प्रश्न पडला असेक की आकाशात इतक्या उंचीवर विमान उडवण्यासाठी पायलटला रस्ता कसा कळतो?
जेव्हा पायलट विमानाचे उड्डाण करतो तेव्हा तो विमानात असलेल्या रेडिओ, रडार आणि जीपीएसचा वापर करतो.
यामुळे पायलटला मार्गासाठी मदत होते आणि प्रवास सहज होतो.
याशिवाय, हवाई वाहतूक नियंत्रण पायलटला दिशा आणि मार्गाबाबत मार्गदर्शन करते.
पायलटला मार्ग अचूकपणे दाखवण्यासाठी HSI म्हणजेच क्षैतिज परिस्थिती निर्देशक वापरला जातो.
ही प्रणाली पायलटला योग्य मार्ग दाखवण्यास मदत करते.