प्रत्येकजण दररोज दात घासण्यासाठी टूथब्रशचा वापर करतो.
कारण टूथब्रशने दात घासल्यास दात निरोगी राहतात. यामुळे दातांमधील प्लाक आणि बॅक्टेरिया दूर होतो.
तसेच दात किडणे आणि हिरड्यांच्या आजाराचा धोका कमी होतो.
मात्र, काही लोक हे अनेक महिने एकच टूथब्रश वापरतात. असे केल्याने दात आणि हिरड्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा टूथब्रश किती दिवसांनी बदलावा याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
दंत तज्ञांच्या मते, दर तीन ते चार महिन्यांनी चांगल्या दर्जाचा टूथब्रश बदलला पाहिजे.
जेव्हा टूथब्रशचे ब्रिसल्स जीर्ण होतात किंवा पसरू लागतात तेव्हा तो बदलला पाहिजे.