बदाम किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत?

पोषक घटक

अगदी सहजगत्या उपलब्ध असणारा आणि शरीराला पोषक घटक पुरवणारा एक कमाल घटक म्हणजे बदाम.

व्हिटामिन

व्हिटामिन आणि मिनरलचा साठा असणाऱ्या या बदामाच्या सेवनानं शरीराला कैक प्रकारे फायदा होतो. याच्या सेवनामुळं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

आरोग्य उत्तम

हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करणारा हा बदाम नेमका किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावा माहितीये?

आहारतज्ज्ञांच्या मते...

आहारतज्ज्ञांच्या मते बदाम कोमट पाण्यात भिजवावेत. ज्यामुळं त्यात असणाऱ्या फायटिक अॅसिडचं प्रमाण कमी होतं. हा तो घटक आहे ज्यामुळं आयर्न आणि झिंक या घटकांच्या शरीरास होणाऱ्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो.

किती वेळ पाण्यात भिजवावेत?

बदाम किमान 8 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. भिजवलेला बदाम कायम साल काढूनच खाण्याचा सल्ला दिला जातो.

माहिती

(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story