दात हे आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. दातामुळे अन्न खाण्यास मदत होते शिवाय आपल्या सौंदर्यात चमक आणतो.
त्यामुळे दाताचे सौंदर्य आणि ते निरोगी ठेवण्यासाठी आपण रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ब्रश करतो. ते स्वच्छ आणि त्यांची काळजी न घेतल्यास अनेक समस्या निर्माण होतात.
सर्वसामान्यांच्या मनात काय प्रश्न पडतो की, दात निरोगी ठेवण्यासाठी किती मिनिटांपर्यंत ब्रश करावं.
यापूर्वी दातांच्या आजूबाजूला असलेल्या मऊ उतींना इजा होऊ नये म्हणून फक्त 1 मिनिटं ब्रश करण्याचा सल्ला दिला गेला होता.
मात्र नुकताच एका संशोधनानुसार शास्त्रज्ञांचं मत आहे की, दात स्वच्छ करण्यासाठी दररोज दोन मिनिटं ब्रश करावे.
सकाळी दोन मिनिटं आणि रात्री झोपताना दोन मिनिटं ब्रश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)