हिवाळ्यात हुडहुडी भरते, गारेगार वारं मग या हिवाळ्यात थंड पाण्यात हात घालायला आपण अवघड तो. अशात डोक्यावरुन आंघोळ करायला अनेक जण टाळतात. अगदी सर्दी होईल म्हणूनही केस धुवत नाहीत.
हिवाळ्यात आपल्या केसांची चमक नाहीशी होऊन ते निस्तेज आणि कोरडे जाणवतात.
हिवाळ्यात अगदी कोंडा होणे, केस तुटणे या सारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे केसाची निगा राखण्यासाठी आठवड्यातून किती वेळा धुवावे याबद्दल जाणून घेऊयात.
काही जणांना वारंवार केस धुतात. त्यांना वाटतं की, त्यामुळे केसांसाठी फायदेशीर आहे. पण त्यातून केस खराब होते.
केसांमधील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होऊ नयेत म्हणून वारंवार केस धुवायला नको असं तज्ज्ञ सांगतात.
ऑयली हेअर असलेल्यांनी निदान आठवड्यातून तीन वेळा केस धुवावे. तर ड्राय केस असलेल्या लोकांनीदेखील आठवड्यातून तीन वेळा धुवू शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)