बऱ्याचदा लोकांना वाटतं की गाड्यांचा इंधन टॅंक फुल करणं चांगलं ठरतं, पण तसं नाहीये.
लोकं पेट्रोल पंपवर जाऊन गाड्यांचा इंधन टॅंक डिझेल किंवा पेट्रोलने फुल करतात. पण अशाने कारचं नुकसान होऊ शकतं.
इंधन टॅंक फुल असेल तर गाडी खड्ड्यातून जाताना टॅंकमधून इंधन बाहेर येण्याची शक्यता असते.
इंधन टॅंक फुल केल्यास त्यातून इंधन बाहेर पडण्याची शक्यता असते ज्यामुळे ते वाया जाऊन नुकसान होते.
जेव्हा गाडी उतारावर उभी केली जाते तेव्हा भरलेल्या टॅंकमधून इंधनाची हालचाल थांबते आणि गळती होण्याचा धोका असतो.
भरलेला टॅंक इंधन टॅंकमध्ये उच्च दाब निर्माण करू शकते, ज्यामुळे कारच्या इंधन प्रणालीवर खराब परिणाम होऊ शकतो.
प्रत्येक कारच्या इंधन टाकीची विशिष्ट क्षमता असते, जी उत्पादकाद्वारे निश्चित केली जाते. त्या मर्यादेपर्यंत इंधन भरणं चांगलं ठरतं.