झोप आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची असते. झोप प्रत्येक व्यक्तीचं काम, वय आणि जीवनशैलीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.
कमी झोप झाली तर शरीरावर परिणाम होऊ शकतो. तेव्हा महिलांना पुरुषांपेक्षा किती वेळ जास्त झोप गरजेची असते? याविषयी जाणून घेऊयात.
स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल बदल, गर्भधारणा आणि मेनोपॉज इत्यादींमुळे महिलांची झोप खराब होते.
इंस्टाग्राम पर डॉक्टर मनन वोरा यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात महिलांना पुरुषांपेक्षा किती वेळ जास्त झोप घेणं गरजेचं याबद्दल सांगितलंय.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एका महिलेला दररोज पुरुषांपेक्षा 20 मिनट जास्त झोप घेणं गरजेचं आहे.
अनेकदा पाहिलं असेल की महिला पुरुषांच्या तुलनेत कमी झोप घेतात. पण याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
महिलेला दिवसातून कमीतकमी 8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. जर काही कारणांमुळे रात्री झोप पूर्ण झाली नाही तर दिवसातून काही वेळ काढून झोप पूर्ण करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
8 तासांच्या झोपेमुळे शरीर आतून दुरुस्त होतं आणि हार्मोन्स संतुलित राहतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)